Home अहमदनगर उसाच्या शेतात ओढून महिलेचा विनयभंग तर मारहाणीच्या परस्पर विरोधी तक्रारी

उसाच्या शेतात ओढून महिलेचा विनयभंग तर मारहाणीच्या परस्पर विरोधी तक्रारी

Moisture of a woman by dragging her in a sugarcane field crime filed

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथील ३१ वर्षीय महिलेचा रस्त्याने ती आपल्या नातेवाईकांच्या सोबत जात असताना गावातील आरोपी प्रसाद भगवानदास महाले व गौरव भगवानदास महाले या दोघांनी उसाच्या शेतात  ओढले व तिच्या अंगावरील कपडे फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. नातेवाईक सोडविण्यासाठी मध्ये पडले असता त्यानाही लोखंडी  रॉडने मारहाण व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रसाद भगवानदास महाले व गौरव भगवानदास महाले यांच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर विरोधी गट मनीषा प्रसाद महाले यांनी कोपरगाव तालुका पोलीस फिर्याद दाखल केली असून  त्यात विनयभंगाबाबत तक्रार करणार्‍या महिलेच्या व तिच्या अन्य नातेवाईक आरोपी मीनाक्षी भगवानदास महाले, भगवानदास पंढरीनाथ महाले, रचना शिवाजी महाले, शिवाजी पंढरीनाथ महाले, रंजना रामदास महाले, रामदास पंढरीनाथ महाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यात वरील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला घराबाहेर बोलावून, तू, आमच्या भांडणात का पडते, तुझा काही एक संबंध नाही. ती जमीन आमची आहे. ती तुला मिळणार नाही, असे म्हणत फिर्यादीस आरोपी मीनाक्षी महाले हिने शिवीगाळ करून मारहाण केली तर आरोपी रचना महाले व रंजना महाले यांनी फिर्यादीस धक्का देऊन व मारहाण करून खड्ड्यात ढकलून दिले. त्यामुळे तिच्या उजव्या पायाच्या हाडास तडा गेला आहे. तसेच फिर्यादीचा पती व मुलगा हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांना पण शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Moisture of a woman by dragging her in a sugarcane field crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here