Home क्राईम सख्खा मित्रच निघाला आईचा प्रियकर; गोठ्यात नेऊन दोस्ताने दोस्तालाच कोयत्याने संपवलं

सख्खा मित्रच निघाला आईचा प्रियकर; गोठ्यात नेऊन दोस्ताने दोस्तालाच कोयत्याने संपवलं

Breaking Crime News: महिलेशी प्रेमप्रकरण, तरूणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना.

Love affair with a woman, brutal murder of a young man

लातूर : लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरूणाची  निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. रंजित तानाजी माळी असे या 25 वर्षीय मयत तरूणाचे नाव होते. औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेत मृत तरूणाचे एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरू होते. विशेष म्हणजे ज्या महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरु होते, ती महिला त्याच्याच मित्राचीच आई होती. त्यामुळे मित्राला या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्याने रंजित माळीची हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण लातूर हादरलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  रंजित माळी हा अविवाहीत होता आणि दुधाचा व्यवसाय करायचा.शुक्रवारी नेहमीप्रमाणे रंजित त्याच्या गोठ्यात झोपायला गेला होता. यावेळी अज्ञाताने त्याच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार कोयत्याने वार करून त्याची हत्या केली होती. ही घटना शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती भादा पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तसेच पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करायलाही सुरुवात केली होती.

रूवातीला काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय होता. मात्र गावात चौकशी केली असता एक वेगळाच ट्वीस्ट समोर आला. रंजित माळीचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि याच महिलेचा अल्पवयीन मुलगा हा रंजितचा चांगला मित्र होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्याच मित्रावरच संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली होती. या चौकशीच्या सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली होती. या दरम्यान रंजितच्या हत्येसाठी जे शस्त्र वापरण्यात आले होते. त्या शस्त्राला धार गावातील एका तरूणाने करून दिली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीणच बळावला आणि त्यांनी कसून चौकशी केली असता अल्ववयीन मुलाने हत्येची कबुली दिली आहे.

मयत रंजित माळी आणि अल्पवयीन मुलगा हे खूप चांगले मित्र होते. दोघांचे एकमेकांच्या घरी नेहमी येणे-जेणे असायचे. यातूनच रंजितचे अल्पवयीन मुलाच्या आईची प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधाचा संशय आला असता अल्पवयीन मुलाने रंजित माळीच्या हत्येचा कट रचला. सुरुवातीला अल्पवयीन मुलाने रंजित माळीच्या दिनचर्येंवर पाळत ठेवली. त्यानंतर त्याने रंजितच्या हत्येचा कट रचला होता. या हत्येसाठी त्याने मित्राकडून कोयत्याला धार करून आणली होती. त्यानंतर रात्री गोठ्यात जाऊन त्याने गळ्यावर कोयत्याने वार करीत निर्घुण  हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन अधिक तपास करीत आहे.

Web Title: Love affair with a woman, brutal murder of a young man

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here