Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! जिल्ह्यात तीन कोरोना बाधित आढळले

अहमदनगर ब्रेकिंग! जिल्ह्यात तीन कोरोना बाधित आढळले

Breaking News | Corona virus:  शाळेतील दोन विद्यार्थी कोरोनाबाधित.

Three corona cases were found in the Ahmednagar

अहमदनगर: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.  रविवारी राज्यात तब्बल 131 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. धक्कादायक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.  

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने अहमदनगरमध्ये  शिरकाव केला असून शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना (Corona) कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. या दरम्यान राज्यात हळूहळू पसरत असलेल्या जेएन १ या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण अनेक भागात आढळून आले आहेत. या व्हेरिएंटने अधिक धोका नसला तरी सतर्क राहणे हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अहमदनगर तालुक्यातील दोन विद्यार्थी कोरोना बाधित झाले असून दोन दिवसांपूर्वी त्यांची तपासणी करण्यात आली होती.

तसेच नाशिक जिल्ह्यात रविवारी नव्या विषाणूचे जेएन १ चे  तीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Web Title: Three corona cases were found in the Ahmednagar

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here