प्रेम करून लग्न केलं पण…, तरुणीचा घरातच आढळला मृतदेह, थरारक सत्य
Pune Crime: सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह झालेल्या विवाहितेचा मृतदेह (Dead body) फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आंबेगाव: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह झालेल्या विवाहितेचा मृतदेह फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साक्षी अक्षय गाडे ( वय २०) असे मृत विवाहितेचे नाव असून २० नोव्हेंबर रोजी हा प्रकार मंचर परिसरातील माळवाडी इथल्या संकल्प रेसिडेन्सी इथे घडला होता. याबाबत आता संबधित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून तिच्या आत्महत्येस पतीच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. साक्षीची आई अरुणा संजय गांजाळे (रा. मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची साक्षी आणि अक्षय यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी न्यायालयात जाऊन लग्न केले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे हिंदू रिती रिवाजाप्रमाणे गणराज मंगल कार्यालय मंचर येथे दि.१२ जून २०२३ रोजी लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली.
अक्षयने ‘कॅफेमध्ये साहित्य खरेदीसाठी केलेली पैशाची मागणी पूर्ण केली. त्यानंतर “कर्ज झाले आहे असे सांगून दोन लाख रूपयांची मागणी अक्षयने केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर “मी साक्षीला सांभाळणार नाही, तिला संपवून टाकेन मला कोणीही काही करू शकत नाही. मी यापूर्वी ५० हजार रुपये खर्च करून दुसऱ्या मुलीचा मॅटर सॉव्ह केला आहे. त्यामुळे हा मॅटर सुध्दा मी सॉल्व करू शकतो.” अशी धमकी त्याने दिली.
तसेच त्याचे दुसरीकडे अनैतीक संबंध होते. हे साक्षीच्या निदर्शनास आले. तेव्हा साक्षीने विरोध करायाला सुरुवात केली. अक्षय हा दारू पिऊन येऊन साक्षीला मारहाण करत होता. तसेच त्याने साक्षीला भररस्त्यावर देखील मारहाण केली होती. हा सर्व प्रकार साक्षीने मला सांगितला होता, असे फिर्यादीत आईने नमूद केले आहे. ‘माझ्या मुलीच्या मृत्यूस तिचा नवरा अक्षय हाच कारणीभूत असल्याचे’ फिर्यादीत म्हटले आहे.
यावरून पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अक्षय गाडे विरुद्ध दाखल केला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंके या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Web Title: Loved and married but…, the Dead body of the girl was found in the house
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App