Home अहमदनगर संगमनेरात कत्तलखाने सुरूच, लाखो रुपयांचे गोमांस जप्त

संगमनेरात कत्तलखाने सुरूच, लाखो रुपयांचे गोमांस जप्त

Sangamner Crime:  शहरातील मोगलपुरा परिसरामध्ये छापा (Raid) टाकला असता या ठिकाणी गोवंशीय जातीच्या जीवंत जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री.

Slaughterhouses continue in Sangamnera, beef worth lakhs seized

संगमनेर:  शहरातील कत्तलखाने बंद असल्याचे शहर पोलीस सांगत असले, तरी काही भागात बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.  शहरातील मोगलपुरा परिसरातील बेकादेशीर कत्तलखान्यावर काल बुधवारी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कत्तलखान्यामधून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 600 किलो गोमांस जप्त केले.  भल्या सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

स्थानिक गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन अडबल, कॉन्स्टेबल आकाश काळे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव यांच्या पथकाने शहरातील मोगलपुरा परिसरामध्ये छापा टाकला असता या ठिकाणी गोवंशीय जातीच्या जीवंत जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस पथक याठिकाणी गेले असता जनावरांची कत्तल करणारे आरोपी पोलिसांना पाहून पळून गेले.

त्यापैकी शफिक महंमद कुरेशी (वय 32, रा. जमजम कॉलनी), शेहबाज गुलफाम कुरेशी (वय 32, रा. मोगलपुरा) यांचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. तर मुजाहित उर्फ मुज्जू दौला कुरेशी, हारुण सुलतान कुरेशी, कलीम जलील कुरेशी, शाहिद इर्शाद कुरेशी, उमर शकुर कुरेशी, खलील बुढण कुरेशी सर्व रा. मोगलपुरा असे पळून गेललेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती या पथकाला मिळाली.

पोलिसांनी या ठिकाणाहून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 600 किलो गोमांस, लोखंडी सुरा असा एकूण 1,20,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक सचिन दत्तात्रय अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर सर्व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बेकादेशीर कत्तलखाने सुरू आहेत. अनेकदा कारवाई करूनही हे कत्तलखाने बंद होण्याचे नाव घेत नाही. डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी कत्तलखाने बंद करण्यासंदर्भात वेळोवेळी पावले उचलली असतानाही शहरातील कत्तलखाने मात्र, बंद झालेले नाही.

Web Title: Slaughterhouses continue in Sangamnera, beef worth lakhs seized

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here