Home औरंगाबाद धक्कादायक! हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या

पंचवटी हॉटेलमध्ये एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

over commits suicide by hanging himself in a hotel

छत्रपती संभाजीनगर: बाबा पेट्रोल पंप चौकाजवळील पंचवटी हॉटेलमध्ये एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता उघडकीस आली. मृत प्रियकर-प्रेयसी हे दोघेही बिडकीनचे आहेत.

ऋषीकेश राऊत (२६, रा. सोनार गल्ली, बिडकीन) आणि दीपाली मरकड (१८, रा. ढाकेफळ, ता. पैठण. ह. मु. सोनार गल्ली, बिडकीन), असे मृत प्रियकर-प्रेयसीचे नाव आहे. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, ऋषीकेश बिडकीनमध्ये ग्राफिक्स डिझाइनचे काम करीत होता, तर दीपाली बीए द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. एकाच गल्लीत राहायला असल्याने त्यांची ओळख झाली होती. दीपालीच्या वडिलांचे मूळ गाव ढाकेफळ आहे. मात्र, ते नोकरीनिमित्त बिडकीनमध्येच राहतात. दीपाली काही कारणाने नुकतीच ढाकेफळला गेली होती. दरम्यान, ५ सप्टेंबरच्या सायंकाळपासून बेपत्ता असलेला ऋषीकेश ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री ढाकेफळ गावात गेला. मध्यरात्री त्याने गावातून दीपालीला सोबत घेतले आणि पंचवटी हॉटेल गाठले. दोघांची कागदपत्रे घेऊन त्यांना पंचवटीच्या व्यवस्थापकाने रूम दिली. सकाळी बराच वेळ झाला, तरी ऋषीकेश आणि दीपाली यांची काहीही हालचाल दिसली नाही. त्यामुळे वेटरने आवाज दिला असता, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. वेटरने रूममधील लँड – लाइनवर फोन लावला. तोदेखील उचलला नाही. त्यानंतर बऱ्याच वेळाने व्यवस्थापकाने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर ही माहिती वेदांतनगर पोलिसांना दिली.

Web Title: lover commits suicide by hanging himself in a hotel

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here