Home अहमदनगर जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगलांची आत्महत्या

जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगलांची आत्महत्या

Lovers commit suicide by hanging themselves from a tree in the forest

पारनेर | Suicide: पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ गावाच्या शिवारातील वनविभागाच्या हद्दीत एका विवाहित जोडप्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यामधील पुरुष मांडओहळ (खडकवाडी) येथील व महिला माळवाडी (पळशी) येथील आहे. वडगाव सावताळ वनकुटे रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगलाने आत्महत्या केली असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक घनश्याम बळप  व सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्याचे ठिकाणी एक चार चाकी गाडी आढळून आली. सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी या घटनेची माहिती दिली. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Lovers commit suicide by hanging themselves from a tree in the forest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here