Home अहमदनगर जिल्हातील या तालुक्यात मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली  

जिल्हातील या तालुक्यात मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली  

Rahata taluka Heavy Rain

राहता | Heavy Rain: राहता तालुक्यात या हंगामातील सर्वाधिक पाउस झाला आहे. रांजणगाव परिसरात ११८ मिमी पावसाची नोंद तर राहता येथे ५० मिमी, शिर्डी ३५ मिमी, चितळी येथे ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या मुसळधार पावसामुळे अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत.  शेतात पाणी साठले आहे. सोयाबीन व इतर पिके पाण्यात होती. या हंगामातील हा पहिलाच धुव्वाधार पाउस होता. सायंकाळी विजेचा कडकडाट सुरु झाला. तब्बल एक ते दीड तास मुसळधार पाउस सुरु होता. हा पाउस अडीच तास टिकून होता. त्यांनतर पावसाचा जोर कमी होत गेला. पहाटेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाउस सुरु होता. सर्वत्र पाणीच पाणी करत परिसर झोडपून काढला आहे.

अनेक ठिकाणी सोयाबीन काढण्यास आली आहे. शेंगा लगडल्या आहेत. शेंगा पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. रांजणगावात तब्बल ११८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ओढ्यांना पाणी वाहिले आहे. अस्तगाव, रांजणगाव भागात जोरदार पाउस झाल्याने तळे तुडुंब भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Rahata taluka Heavy Rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here