Home अकोले Akole: अकोलेत पावसाचा हाहाकार: वीज कोसळून गाय आणि बैलाचा मृत्यू

Akole: अकोलेत पावसाचा हाहाकार: वीज कोसळून गाय आणि बैलाचा मृत्यू

Akole Cows and oxen die in lightning strikes

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील देवठाणच्या काठवाडीत मंगळवारी रात्री 11.00 च्या सुमारास मेघगर्जनेसह सुरु झालेल्या पावसात वीज कोसळून बैल आणि गाय मृत्युमूखी पडल्याची घटना घडली आहे. या घटनेने या  शेतक-याचे एक लाखापेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.

लक्ष्मण नामदेव पथवे रा, देवठाण यांचे मालकीचे बैल आणि गायीवर ही वीज कोसळल्याने दोन्ही जनावरे जागीच मृत्यूमुखी झाले आहेत. त्यांचे वस्तीवर ही दोन्ही जनावरे घराबाहेर बांधलेली असताना रात्रीच्या वेळी सर्वजण झोपेत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. तीन महिन्यांपुर्वी या शेतक-याची बैलजोडी नांगरासकट विहीरीत पडली होती. त्यावेळी एक बैल मयत झाला होता. राहिलेला एक बैल आता बैलावरही वीज कोसळल्याने शेतकरी एकदम हतबल झाला आहे.

देवठाणचे सरपंच केशव बोडके, माजी पं.स.सदस्य अरुण शेळके आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर धिंदळे, डॉक्टर कुसळकर आणि कामगार तलाठी बाळकृष्ण सावळे यांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान दोन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पाउस होत असल्याने तालुक्यात वीज पडल्याच्या दोन दिवसांत दोन घटना घडल्या आहेत.

Web Title: Akole Cows and oxen die in lightning strikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here