Home अहमदनगर अहमदनगर: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून  युवतीची आत्महत्या, युवकाविरुद्ध गुन्हा

अहमदनगर: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून  युवतीची आत्महत्या, युवकाविरुद्ध गुन्हा

Ahemdnagar Suicide News:  प्रियकराने वारंवार फोन करून मानसिक त्रास दिल्याने एका सतरा वर्षीय युवतीने कडुनिंबाच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील घटना: युवकाविरुद्ध गुन्हा दाखल.

lover's troubles, a young woman commits suicide

अहमदनगर : घरच्यांचा विरोध डावलून आपल्याशी लग्न कर असा तगादा लावत प्रियकराने वारंवार फोन करून मानसिक त्रास दिल्याने एका सतरा वर्षीय युवतीने कडुनिंबाच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात घडली. याप्रकरणी युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवानी पदू भोसले (वय १७, रा. वाळुंज, ता. नगर) असे मयत युवतीने नाव आहे. याबाबत तिचे वडील पदू भाना भोसले यांनी मंगळवारी (दि.१७) सांगितले. सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोसले यांची मुलगी शिवानी हिने शनिवारी (दि. १४) सकाळी ६ वाजण्यापूर्वी वाळुंज शिवारात गुगळे यांच्या पडीक जमिनीच्या बांधालगत असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत प्रारंभी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तिच्या आई वडिलांचे जबाब नोंदविले. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिच्या आत्महत्येमागील कारण पोलिसांना

मयत शिवानी हिची रियाज झारकन चव्हाण (रा. येवला, जि. नाशिक) या युवकाशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने तिला वारंवार फोन करून तिच्याशी लग्नासाठी तगादा लावला. ही बाब सदर युवतीने आई- वडिलांना सांगितली. त्यावेळी तिच्या वडिलांनी ‘तुझे वय १८ वर्षे पूर्ण झालेले नाही त्यामुळे काही दिवस थांब त्यानंतर आपण तुझे लग्न लावून देऊ, असे सांगितले.

ही बाब मयत शिवानीने रियाज चव्हाण यास फोन करून सांगितल्यानंतर त्याने तिला आई- वडिलांचा विरोध डावलून माझ्याशी लग्न कर, असा वारंवार फोन करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. शुक्रवारी (दि.१३) रात्री त्याने तिला फोन करून फोनवर तिच्याशी जोरदार भांडण केले. त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केली, अशी फिर्याद मयत शिवानी हिच्या वडिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी रियाज चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग हे करीत आहेत.

Web Title: lover’s troubles, a young woman commits suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here