Crime News: पीडित मुलाला फटाके देण्याचे आमिष दाखवून त्याला एका इमारतीत नेले व मुलावर अत्याचार (abused) केल्याची घटना.
मुंबई : फटाक्यांचे आमिष दाखवून ८ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अॅण्टॉप हिल परिसरात घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील ३२ वर्षीय सराईत आरोपीला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचार, धमकावणे व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील पीडित मुलगा व त्याचा मित्र दोघेही सोमवारी घराजवळ फटाके फोडत होते. त्यावेळी आरोपीने तेथे जाऊन पीडित मुलाला फटाके देण्याचे आमिष दाखवून त्याला एका इमारतीत नेले व मुलावर अत्याचार केला. तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर मंगळवारी अॅण्टॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचार, ठार मारण्याची धमकी व पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
Web Title: luring the victim with firecrackers, he was taken to a building and abused
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App