Home अहमदनगर अहमदनगर: मढी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

अहमदनगर: मढी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

Breaking News | Ahmednagar Crime: मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मढी देवस्थानच्या चार कर्मचाऱ्यांना अज्ञात चार ते पाच इसमांनी मारहाण करण्याची घटना.

Madhi Devasthan employees beaten

पाथर्डी : मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मढी देवस्थानच्या चार कर्मचाऱ्यांना अज्ञात चार ते पाच इसमांनी मारहाण करण्याची घटना मढी येथे रविवारी (दि.३१) घडली आहे. यावेळी झालेल्या मारहाणीच्या वेळी जोरदार दगडफेक झाली असून, एका चारचाकी वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या.

देवस्थानचे कर्मचारी अभिषेक बाळासाहेब मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मढी देवस्थानने तीन वर्षांपूर्वी कानिफनाथ मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास बंदी घातली होती. या निर्णयावरून पूर्वी वादही झाले होते.

चालू वर्षीसुद्धा मंदिर परिसरात पशुहत्या करू नका, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी केले होते. अभिषेक मरकड, देवस्थानचे अध्यक्ष मरकड, दत्तात्रय वसंत मरकड, राहुल अशोक कुटे हे सोबत असताना दत्तू पाखरे यांच्या शेतात गर्दी दिसली. त्यामुळे अभिषेक मरकड व इतर पाखरे यांच्या शेतात गेले. तेथे काही अज्ञात इसम उभे होते. त्यांनी एक बोकड कापण्यासाठी आणला होता. त्यांना पशुहत्या करू नका, असे मरकड व इतरांनी सांगितले. त्यावर त्या इसमांनी आम्ही बोकड कापणारच, असे सांगत अभिषेक मरकड यांना मारहाण केली. इतरांनी मरकड यांच्यासोबत असलेल्या जगदीश धाडगे, राहुल कुटे, प्रवीण ढवळे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Madhi Devasthan employees beaten

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here