Home अकोले अकोले: मधुकरराव तळपाडे पुन्हा विधानसभा निवडणूक लढविणार

अकोले: मधुकरराव तळपाडे पुन्हा विधानसभा निवडणूक लढविणार

अकोले: मधुकरराव तळपाडे पुन्हा विधानसभा निवडणूक लढविणार

अकोले: शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवून पिचड घराण्याला खिंडीत गाठणाऱ्या मधुकरराव तळपाडे पुन्हा एकदा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना नेते मधुकरराव तळपाडे यांच्या या निर्णयाने स्वपक्षीय शिवसेनेसह भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मात्र मोठी दमछाक होणार आहे. मधुकरराव तळपाडे हे पोलीस खात्यात मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होते मात्र सन २००९ साली अकोले तालुक्याचा विकास करावा. आदिवासी जनतेची सेवा करावी या उदात्त हेतूने मधुकरराव तळपाडे यांनी नोकरी सोडून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीत तळपाडे यांनी माजी मंत्री पिचड यांच्या विरोधात जोरदार प्रचार करून राष्ट्रवादी पक्षाला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत मधुकरराव तळपाडे यांना ५२ हजार मते मिळाली. राजकारणात माहीर असलेल्या माजी मंत्री पिचडानी बहुरंगी लढतीचा कलगीतुरा लावून मत विभाजन करीत ८ हजार मताधिक्याने विजय मिळविला. यानंतर पुन्हा २०१४ साली मातोश्रीचा आदेश मानत मधुकरराव तळपाडे यांनी धनुष्यबाण हाती घेत जोरदार प्रचार केला मात्र वरिष्ठ पातळीवर भाजप सेना युती तुटल्य्यामुळे याही निवडणुकीत त्यांना बहुरंगी लढतीचा तोटाच झाला.  

Website Title: Madhukarrao Talpade will again contest the Vidhan Sabha election


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here