संगमनेर: एका तरुणीचा शिवशाही बसमधून लॅपटॉप चोरीला
संगमनेर: एका तरुणीचा शिवशाही बसमधून लॅपटॉप चोरीला
संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या घारगाव येथील हॉटेल दौलत येथे थांबलेल्या शिवशाही बसमधून एका तरुणीचा ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉपसह इतर साहित्य अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना मंगळवार दिनांक ८ जानेवारी रोजी दुपारी दोन ते साडे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, जम्मीन बशीर तांबोळी रा. लोणी या मंगळवारी पुणे येथून शिवशाही बसमधून एम.एच.०९ १६२८ मधून लोणीकडे जात होत्या. दुपारी दोन ते साडे तीन वाजेच्या सुमारास हि शिवशाही बस पुणे नाशिक महामार्गावरील घारगाव याठिकाणी असणाऱ्या हॉटेल दौलतला जेवण्यासाठी थांबली होती. त्याच दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने तांबोळी यांचा ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व लॅपटॉप साहित्य चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यानवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय विखे हे करीत आहे.
Website Title: sangamner news Laptop stolen from Shivshahi bus
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: