महंत त्यागीनंद महाराजांच्या गाडीच्या भीषण अपघातात मृत्यू, दोन ठार, पाच जखमी
नांदेड | Nanded: नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथील त्यागी महाराज यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी ते जात होते. बिहारमध्ये हा अपघात झाला. या अपघातात महंत त्यागीनंद महाराज यांच्यासह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला असून कारमधील अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
पुणेगाव येथील मठाचे योगी त्यागी महाराज यांचे जिल्ह्यासह राज्यभरातून भक्त आहेत. दरवर्षी ते पुणेगाव येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्या निमित्त उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी ते दोन दिवसांपूर्वी पुणेगाव येथून कारने निघाले होते. या कारमध्ये चालकासह सात जण होते.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार बिहार राज्यातील चाळीसगाव परिसरात आली असताना चालकाचा डोळा लागल्याने कारची ट्रकला पाठीमागून धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की कारमधील योगी त्यागी महाराज आणि बळीराम विक्रम पुयड यांचा जागीच मृत्यू झाला. त्यागी महाराज यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पुणेगाव वर शोककळा पसरली आहे.
Web Title: Mahant Tyaginand Maharaj died in a horrific car accident