मोठी बातमी: राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा
मुंबई: राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) दोन महिने सश्रम करावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवणे बच्चू कडू यांना चांगलेच महागात पडले आहे. याबाबत भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू यांच्या अंगाशी आले आहे. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 साली याबाबत तक्रार केली होती. अखेर आज चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने निर्णय देत बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिलीली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली.
Web Title: Minister of State Bacchu Kadu sentenced to 2 months rigorous imprisonment