Home बीड इंदोरीकरांचा गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष निशाणा: 3 गाणी वाजवून 3 लाख रुपये घेतले...

इंदोरीकरांचा गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष निशाणा: 3 गाणी वाजवून 3 लाख रुपये घेतले आणि आम्ही…

Gautami Patil: आष्टी तालुक्यात एका कीर्तनात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या शैलीत  गौतमी पाटीलवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

Maharaj Indurikar in his style targeted Gautami Patil without naming her

बीड: आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तिने ३ गाणी वाजवून तीन लाख रुपये घेतले आणि आम्ही ५ हजार रुपये जास्त मागितले, तर लोक म्हणतात काय खरंय याचं, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. ते बीडमध्ये आयोजित कीर्तनात बोलत होते.

गौतमी पाटीलवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, ‘तिने (गौतमी पाटीलने) ३ गाणी वाजवली आणि ३ लाख रुपये घेतले. तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहींचे गुडघेही फुटले, पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही आणि आम्ही ५ हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात की काय खरंय त्याचं, सगळी जनता लुटली से म्हणतात.’

बीडमधील आष्टी तालुक्यातील तवलवाडी या गावात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आपल्या शैलीत त्यांनी गौतमी पाटील हिचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे.

ज्या भागात इंदुरीकर महाराज कीर्तन करत होते, त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्येही प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. लोकांची धावपळ उडाली होती. गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना इंदुरीकर महाराजांनी या घटनेचा संदर्भ दिला.

Web Title: Maharaj Indurikar in his style targeted Gautami Patil without naming her

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here