Home उस्मानाबाद दर्शनासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा महाराजांनी केला विनयभंग

दर्शनासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा महाराजांनी केला विनयभंग

Usmanabaad: Woman molested महाराजांनी शरीरसंबंध ठेवावे लागतील, असे सांगितले.

Maharaja molested a married woman who went for darshan

कळंब (जि. उस्मानाबाद): दर्शनासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा महाराजांनीच विनयभंग केल्याची घटना गुरुवारी दुपारी मलकापूरच्या मठात घडली. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पहाटे आरोपी महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती. गुरुवारी ती एकटीच मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली. गुरुवारची गर्दी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे जेवण सुरू असल्याने ही महिला एका झाडाखालील केला. ओट्यावर बसली. तेव्हा एकनाथ महाराजांच्या शिष्याने तिच्याजवळ येऊन महाराजांनी खोलीत बोलावल्याचे सांगितले.

गेल्यानंतर महाराजांनी शरीरसंबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. यास विरोध केल्यानंतर झोंबाझोंबी व मारहाण करीत त्यांनी महिलेचा विनयभंग केला. आरडाओरडा केल्यामुळे शिष्याने दार उघडले. यावेळी मारहाण करून गळा दाबण्याचा प्रयत्नही महाराजाने केल्याची तक्रार महिलेने येरमाळा पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार शुक्रवारी पहाटे एकनाथ महाराजावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महाराज फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक जी. पी. आत पुजरवाड यांनी सांगितले.

Web Title: Maharaja molested a married woman who went for darshan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here