महाराष्ट्र चिंतेत: राज्यात ३१ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले
मुंबई | Corona News Omicron: राज्यात ओमायक्रॉन रुग्णवाढीचा वेग वाढला आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात एकूण ३१ नवे ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.
या ३१ रुग्णांपैकी २७ रुग्ण फक्त मुंबईत आढळून आले आहेत. पुणे ग्रामीण व अकोला ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
तर मुंबईमध्ये एकूण ओमीक्रोन बाधितांची संख्या (राज्यात सर्वाधिक) ७३ एवढी झाली आहे.
त्यापाठोपाठ पुणे ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील ओमीक्रोन बाधितांची संख्या २२ वर पोहचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १९ रुग्ण आहेत.
सातारा जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यात ओमीक्रोन बाधितांची संख्या प्रत्येकी ५ वर पोहचली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३ रुग्ण आहेत.
कल्याण-डोंबिवली, नागपूर व औरंगाबाद शहरात प्रत्येकी २ रुग्ण आहेत.
बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला जिल्ह्यांसह वसई विरार, नवी मुंबई व मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी १ रुग्ण ओमीक्रॉन बाधित आहे.
राज्यातील नव्या ३१ रुग्णांसह राज्याची ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णसंख्या १४१ वर पोहचली आहे. आजवर ६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Web Title: Maharashata Corona news Omicron Cases 31