Home Accident News सेफ्टी टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी

सेफ्टी टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी

Accident Two died and one was injured after falling into a safety tank

अहमदनगर| Ahmedagar | Accident: सेफ्टी टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना  निंबळक (ता. नगर)) येथे आज दुपारी घडली. साहेबराव भागाजी खेसे (वय 50 रा. निंबळक) व कामगार अरूण श्रीधर देठे (वय 38 रा. नागापुर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. अजून एक कामगार झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सेफ्टी टँकमधील मैला काढण्यासाठी साहेबराव खेसे यांनी दोन कामगार बोलवले होते. मैला काढताना एक कामगार टॅंकमध्ये पडला असता त्याला बाहेर काढण्यासाठी मालक खेसे व दुसरा कामगार प्रयत्न करत असताना ते देखील त्यामध्ये पडले. यामध्ये खेसे व एक कामगाराचा मृत्यू झाला आहे. दुसरा कामगार जखमी झाला आहे.

Web Title: Accident Two died and one was injured after falling into a safety tank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here