Home महाराष्ट्र Maharashtra Budget 2022:  राज्यात सीएनजी स्वस्त होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget 2022:  राज्यात सीएनजी स्वस्त होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget 2022 CNG will be cheaper in the state

Maharashtra Budget 2022:  राज्यात २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात सीएनजीबाबत (CNG Price) एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. नैसर्गिक वायूंवर असणारा कर कमी केल्याने महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळाला आहे.  

सीएनजीचे दर आता तब्बल साडेदहा टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. नैसर्गिक वायूवर साडे दहा टक्क्यांनी जीएसटी कमी करण्यात आला आहे.

सीएनजी कर साडे तेरा टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातीलसीएनजी स्वस्त होणार आहे. तसेच नैसर्गिक वायुवरचा कर कमी केल्यामुळे आता पीएनजीचा दर  देखील कमी होईल.

Web Title: Maharashtra Budget 2022 CNG will be cheaper in the state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here