Maharashtra Lockdown: १५ मे पर्यंत कडक निर्बंध जाहीर वाचा काय सुरु अन काय बंद
Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने १ मे सकाळी ७ वाजेपासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. याबाबत सरकारकडून जीआर काढून अधिकृत घोषणा केली आहे.
काय राहणार सुरु:
राज्यात सर्व किराणा, भाज्यांची दुकानं, फळ विक्रेते, डेअरी, सर्व प्रकारची खाद्य दुकाने यात चिकन, मासे, अंडी, मटन, कृषी निगडीत सर्व दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत असे चार तास सुरु ठेवता येणार आहे.
वरील सर्व दुकानांना सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत होम डिलिवरी करण्याची मुभा
काय राहणार बंद:
सर्व सलून, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद
शाळा महाविद्यालये, चित्रपट गृह , शॉपिंग माल. हॉटेल, रेस्टॉरंट बंद
क्रीडा संकुल, स्टेडीयम पूर्ण बंद
धार्मिक स्थळे बंदच, धार्मिक कार्यक्रम आयोजन देखील परवानगी नाही.
विवाहासाठी केवळ २५ माणसांना परवानगी
अंत्यसंस्कार केवळ २० माणसांना परवानगी
सर्व खासगी कार्यालये बंद
Web Title: Maharashtra Lockdown Strict restrictions announced till May 15