चिंताजनक: राज्यात ओमायक्राॅनचे नवे २६ रुग्ण आढळले
मुंबई | Omicron: राज्यात तसेच खास करून मुंबईत दिवसागणिक ओमायक्राॅनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण बनले आहे. राज्यात सोमवारी ओमायक्राॅनचे २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये मुंबईतील ११, पनवेल मनपामधील ५, ठाणे मनपा येथील ४, नांदेड २ आणि नागपूर, पालघर, भिवंडी, निजामपूर मनपा, आणि पुणे ग्रामीण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात एकूण ओमायक्राॅन रुग्णांची संख्या १६७ झाली आहे.
दरम्यान राज्यात दोन हजारापर्यंत कमी झालेल्या कोरोना सक्रीय रुग्णांच्या संखेने पुन्हा एकदा १० हजार रुग्णसंख्येचा आकडा ओलांडल्याने राज्याची चिंता वाढली आहे. सध्या राज्यात १० हजार ४४१ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात सोमवारी १४२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये २६ ओमायक्राॅन रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी २१ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Web Title: Maharashtra omicron cases new 26