Home महाराष्ट्र महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव, देशात चौथा रुग्ण

महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव, देशात चौथा रुग्ण

Maharashtra  patient of Omicron in India

मुंबई: कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. देशातील या विषाणूचा चौथा रुग्ण आढळून आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.(Maharashtra  patient of Omicron in India) 

हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. त्याला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.  अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आलीय.

Web Title: Maharashtra  patient of Omicron in India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here