Home क्राईम कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मधुकर पिचड आणि कुटुंबियांवर गुन्हा दाखल

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मधुकर पिचड आणि कुटुंबियांवर गुन्हा दाखल

Madhukar Pichad and family members charged in domestic violence case

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मधुकर पिचड आणि कुटुंबियांवर गुन्हा दाखल

नाशिक : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence) प्रकरणात मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने पिचड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागितली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड महत्वाच्या पदांपासून दूर आहेत. अशावेळी आता पिचड यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे. पिचड यांच्या सुनेने आता पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. कलम 498, 306, 406, 324, 504, 506, 468, 471 अन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Madhukar Pichad and family members charged in domestic violence case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here