Home संपादकीय महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांना करावं लागणार ‘औद्योगिक मंथन’ – इंजि. निलेश गुंजाळ

महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांना करावं लागणार ‘औद्योगिक मंथन’ – इंजि. निलेश गुंजाळ

industrial churn: ‘औद्योगिक मंथन’ This is not the first time that Maharashtra which is India’s richest state has lost out in the race.

Nilesh Gunjal Maharashtra the ruling party and the opposition will have to do an 'industrial churn'

मंथन: असं घडण्याची ही काय पहिली वेळ नाही की जेव्हा भारतातील श्रीमंत राज्यापैकी एक ‘महाराष्ट्र’ शर्यतीत हरलंय . Manufacturing sector मध्ये  असलेलं आपलं वर्चस्व महाराष्ट्र फार जलद गतीने गमावतोय.  Mfg, Automobile ,chemical या सारख्या सेक्टरमध्ये गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांनी महाराष्ट्राला पिछाडीवर टाकले एवढा बलाढ्य  महाराष्ट्र ,एवढा श्रीमंत महाराष्ट्र ,एवढी प्रचंड Resources मग एवढं सगळं असताना असं का होतंय …?

भारतात 200 छोटे-मोठे बंदर  आहेत. त्यात 13 मोठी बंदर आहेत. त्या 13 पैकी दोन बंदर महाराष्ट्राच्या वाट्याला येतात ‘जवाहरलाल नेहरू बंदर’ आणि’ मुंबई बंदर’ गुजरात आणि कर्नाटकला च्या वाट्याला प्रत्येकी एक- एक येतात . त्यानंतर एवढा मोठा समुद्रकिनारा, देशात रस्त्यांचे सर्वात जास्त विस्तृत जाळे महाराष्ट्रात आहे .भारतातील एकूण रस्त्यांपैकी सात 7% रस्ते महाराष्ट्रात आहेत. रेल्वेचे काही वेगळं सांगायला नको देशातील एकूण रेल्वे जाळ्या पैकी महाराष्ट्रात 9 ते 10% रेल्वे जाळे पसरले आहे .देशातील सर्वात जास्त विमानतळांची संख्या ही महाराष्ट्रात आहे एवढी मग एवढी प्रचंड Connectivity असताना सुद्धा असे का होते..? असा प्रश्न सगळ्यांना पडतो आजच्या लेखात थोडं याबद्दल चिंतन करू .महाराष्ट्रातून बिजनेस जाण्याची कारण अनेक असू शकतात, असतील आणि कोणकोणते इंडस्ट्रीज बाहेर गेल्यात  .

TATA motors ज्यावेळेस वेस्ट बंगालच्या सिंगूर प्रांतातून आपला Nano चा प्रोजेक्ट घेऊन बाहेर पडले त्यांनी महाराष्ट्र पेक्षा  गुजरातला प्राधान्य दिले . तमिळनाडू मध्ये फोर्ड मोटरचा पहिला  प्लांट त्यांना विस्तृत करायचा होता आणि त्यांनी पण गुजरात निवडलं. Peageot (French Automobile company) या कंपनीच्या तर शॉर्टलिस्ट मध्ये पण आपलं नाव नव्हतं आणि त्यांनी पण शेवटी गुजरातचा पर्याय निवडला. मारुती सुझुकी ज्यांना 1000 जागा  हवी होती त्यांना हि जागा उपलब्ध होऊ शकली नाही आणि त्यांनी पण गुजरात बरोबर जाण्यास निर्णय घेतला. हिंदुस्थान टाइम्स मध्ये छापलेला एका मुलाखतीनुसार मंत्रालयाचा आकडा सांगतोय की गेल्या पाच वर्षात गुजरातकडे 34 हजार 700 नवीन इंडस्ट्री रजिस्टर झाल्यात हा एवढा मोठा आकडा आश्चर्यचकित करणार आहे आणि याच काळात आपल्याकडे 8142 छोट्या मोठ्या फॉर्म बंद पडल्यात .  का..? एवढ्या प्रचंड प्रमाणात इंडस्ट्रियल लिस्ट गुजरात कडे वळत आहेत हा एवढा मोठा आकडा आश्चर्यचकित करणार आहे याचा अभ्यास करणारे टीम स्थापन व्हायला पाहिजे याची खरी एखादी ईडी चौकशी व्हायला पाहिजे.

या सगळ्याच पहिलं कारण पहिला आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे राजकारण जे लोक सत्तेत बसलेत त्यांच्याकडे पूर्ण बहुमत नसल्यामुळे या गोष्टींची लक्ष द्यायला वेळच नाहीये त्यांना सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्याच आमदारांवर मंत्र्यांवर लक्ष देऊन बसवावे लागते. सरकार किती लोकांना नोकऱ्या देऊ शकत पाच ते दहा टक्के लोक फक्त शासनात -प्रशासनात काम करतायेत उरलेले 90 ते 95 टक्के लोक कोणाकडे तरी काम करताये किंवा छोटा मोठा बिझनेस करताय ह्या लोकांना काय पाहिजे काय गरज  आहे त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारने त्यांना पायाभूत सुविधा पुरवणे हे त्यांचे Prime objective पाहिजेल त्यात जमीन ,पाणी, लाईट ,रस्ते हे प्रामुख्याने येतात .एखादी नवीन Firm सुरु करण्यासाठी टेबलावरती किती कागदपत्रे, एनओसी यांची पूर्तता पाहिजे हे पण महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय येतो तो टेबलाखालच्या कागदांचा त्याविषयी काही बोलायलाच नको….टेबलावरती आणि टेबलखालचे कागदपत्र कमी झाले कि बराच फरक पडेल . एवढ्या मोठ्या प्रश्नावर कोणी चर्चा करायला तयार नाही फार कमी नेतेमंडळी याविषयी बोलताना दिसतात  किंवा माहिती ठेवत आहेत. आपले नेते मंडळी एकमेकांशी भांडणातच व्यस्त आहे हि फार दुर्दैवाची गोष्ट आहे याउलट मोदी शहा दिल्लीत बसून गुजरात कडे बारीक लक्ष ठेवून असतात जगात सर्वात मोठा पुतळा भारतात गुजरात मध्ये ,सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम गुजरात मध्ये, स्वस्त डिझेल पेट्रोल गुजरात मध्ये बरच काही सांगता येईल

लोकशाहीचा चौथा स्तंभ तर कळून न कळल्यासारखा वागतो एवढ्या मोठ्या प्रश्नावर कोणतेही न्यूज चॅनल चर्चा करायला तयार नाही 24 तास न्यूज दाखवायच्या नादात त्यांची पण मजबुरी आहे म्हणा मसाला पाहिजे बातमीत, जो आपल्या बातमीत नाही. साधूला मारलं, धर्मावर बोलला, जातीवाचक . मग एवढं सगळं होताना लोकशाहीतले लोक कुठय …… एवढं सगळं होत असताना मग आपलं शिकलेला तरुण कुठंय…? दैवत , जयंती, पुण्यतिथी, हा माझा ,तो तुमचा आंदोलन, आरक्षण आणि महत्त्वाचं भावना खूप लवकर दुखतात त्यांच्या

हा सर्वसामान्य शिकलेल्या Graduate, Engineer, diploma, ITI यांच्यावर Direct Impact होणारा प्रश्न आहे त्यामुळे उत्तरे आपल्याला शोधावे लागेल. याचे उत्तर शोधताना पुन्हा राजकारणात जावं लागेल स्थिर सरकारने न  दिल्यामुळेच हा प्रश्न वारंवार उद्भवतोय यापुढे आपल्याला स्थिर सरकार निवडून द्यावा लागेल लोक निवडून देतानी चांगल्या हुशार अभ्यासू लोकांनाच निवडून दिलं पाहिजे आणि तसे  लोक जर नसतील तर तुम्हाला स्वतःला राजकारणात यावं लागेल. पक्षांनी चांगल्या लोकांना तिकीट देणं. लोकांनी त्यांना निवडून देणं. पक्षांनी त्यांना चांगली पद देणं हे त्यात आलंच. प्रश्न विचारावे लागतील एवढं सगळं जर गुजरातला आहे तर सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेजेस कशाला महाराष्ट्रात उघडले आम्ही आपली भरमसाठ फी भरतो,  रात्र-रात्र जागून अभ्यास करतो  पास आऊट होते आणि बसतोय उत्कृष्ट शेतकरी ,इंजिनियर चहा ,ग्रॅज्युएट नाष्टा , तलाठी, ग्रामसेवक, एमपीएससी, यूपीएससी त्यातही मंत्र्यांची मुलं निकाल लागायच्या अगोदर सिलेक्ट झालेले असता असो   तो विषय वेगळा आहे.

राजकारणी आणि पक्षाने सुद्धा आपापल्या दिशा ठरवून घेतल्या पाहिजे गुंड प्रवृत्तीच्या ,दलाल, तस्कर लोकांना बरोबर घेण्यापेक्षा महाराष्ट्रात अशी अनेक तरुण आहेत की DM, तहसीलदार, PSI अशा पोस्टला धडका देत आहेत एक मार्क दोन मार्क दहा मार्क इंटरव्यू मधून वर्षानुवर्ष बाहेर येत आहेत अशा लोकांना एकत्र घेऊन काहीतरी त्यांना दिशा ठरवून द्यायला हवी महाराष्ट्रातील नेत्यांनी आपापसात भांडण करत बसण्यापेक्षा राजकारणापुरतं राजकारण करून थोडं ‘मंथन’ करायला हवं जसं समुद्रमंथन एकटे देवही करू शकत नव्हते आणि फक्त दैत्य करू शकत नव्हते त्यांना समुद्रमंथन करण्यासाठी एकत्रित यावं लागलं तसंच हे ‘औद्योगिक मंथन’ करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन काहीतरी पॉझिटिव्ह बाहेर येईल अशी अपेक्षा करून जनतेचा फायदा होईल असे ‘मंथन’ करावे ही अपेक्षा .

धन्यवाद  !

अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..

इंजि.निलेश उमाकांत गुंजाळ

संगमनेर.

Web Title: Maharashtra the ruling party and the opposition will have to do an ‘industrial churn’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here