Home क्राईम Rape: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अज्ञात स्थळी नेऊन अत्याचार

Rape: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अज्ञात स्थळी नेऊन अत्याचार

Rape Case:  अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मुंबई पुणे एक्स्प्रेसवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना.

minor girl was kidnapped and taken to an unknown place and Rape

मुंबई: मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मुंबई पुणे एक्स्प्रेसवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे. मुंबईतील वडाळा येथून मुलीचे अपहरण करण्यात आले. आणि एका अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल वीरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी 5 सप्टेंबर रोजी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाली होती. वडाळा येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेजवळ पीडित मुलगी पोहचली असताना आरोपीने तिचे अपहरण करण्यात आले. आरोपी विशाल वीरकरने पीडितेला बोलेरो कारमध्ये जबरदस्तीने बसवले आणि तिला पुणे एक्स्प्रेस वे च्या दिशेने नेले. एक्स्प्रेस वे लगतच्या एका अज्ञात स्थळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर हे प्रकरण माटुंगा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरु आहे.

Web Title: minor girl was kidnapped and taken to an unknown place and Rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here