Home अहमदनगर पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

main accused in the murder case of journalist Datir 

राहुरी: राहुरी शहरात पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या केल्याची घटना ६ एप्रिल रोजी घडली होती. याअगोदरच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी कान्हू मोरे व अक्षय कुलथे हे गेल्या बारा दिवसांपासून फरार होते.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर आरोप करत सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते.

त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राहुरी पोलीस निरीक्षक नंकुमार दुधाळ यांच्याकडून काढून घेत श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केला होता, रविवारी  मिटके यांच्या पथकाने मुख्य आरोपी कान्हू मोरे यास ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज [पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिटके, योगेश देशमुख, सुरेश औटी, राजेंद्र आरोळे, नितीन चव्हाण, रवींद्र मेढे आदींनी ही कारवाई केली आहे.

Web Title: main accused in the murder case of journalist Datir 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here