Home अहमदनगर दुर्दैवी घटना: कालव्यात पडून एकाचा मृत्यू

दुर्दैवी घटना: कालव्यात पडून एकाचा मृत्यू

Rahuri One died after falling into a canal

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील काळे आखाडा येथे एकाचा कालव्याच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केशव मंजाहरी काळे वय ७५ रा, काळे आखाडा ता. राहुरी असे या मयत व्यक्तीचे नाव आहे.

काळे यांची वस्ती ही कालव्याच्या कडेला आहे. केशव यांना दृष्टीदोष होता. दुपारच्या वेळेत जे घराबाहेर पडले ते पुन्हा आलेच नाही. दुपारी दोन वाजल्यापासून नातेवाईक शोध घेत होते. गुरुवारी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील सिंचन सोडण्यात आले होते. कालव्यातून अडीचसे क़ुसेकने पाणी सुरु होते.   पाय घसरून काळे पडले असल्याचा संशय नातेवाईक यांना आला होता, तो संशय अखेर खरा ठरला रात्री येवले आखाडा येथे त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. गजानन काळे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, एक मुलगा, तीन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Rahuri One died after falling into a canal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here