Home अहमदनगर अहमदनगर: भगर खाल्ल्याने अनेकांना  विषबाधा

अहमदनगर: भगर खाल्ल्याने अनेकांना  विषबाधा

Pathardi: भगर खाल्ल्याने करंजी व परिसरातील अनेकांना विषबाधा (poisoned ) झाली असून काहीजण नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार.

Many people get poisoned by eating bhagar

करंजी : नवरात्रोत्सवात बहुतांश जण नऊ दिवस उपवास करतात. याच उपवासासाठी लागणारी भगर खाल्ल्याने करंजी व परिसरातील अनेकांना विषबाधा झाली असून काहीजण नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी रात्री ही घटना समोर आली. उपवासासाठी चालणारी भगर व भगरीचे पीठ खाल्ल्याने करंजीसह भोसे, खंडोबावाडी येथील अनेक जणांना विषबाधा झाली.

चक्कर येणे, उलट्या, जुलाब अशा प्रकारचा त्रास त्यांना सुरू झाला. यातील काहींनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. भगर खाल्ल्यानंतर येथील लमाण तांड्यावरील रामदास चव्हाण, गीताबाई चव्हाण, प्रकाश राठोड, अनिता राठोड, लिलाबाई चव्हाण, रेश्मा चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीला चव्हाण यांनाही त्रास होऊ लागताच त्यांनी तिसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. दरम्यान, येथील वर्षा मोरे, मच्छिंद्र दानवे, मंगल दानवे आशा मोरेसह अनेकांना ही भगर व भगरीचे पीठ खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे समजते.

Web Title: Many people get poisoned by eating bhagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here