Home अहमदनगर अहमदनगर: पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत तुंबळ हाणामारी

अहमदनगर: पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत तुंबळ हाणामारी

Rahuri Crime: सात महिन्यांपूर्वी राहुरी शहरात गावठी कट्ट्यातून फायर झाल्याची घटना घडली होती

Two groups clashed on the premises of the police station

राहुरी : सुमारे सात महिन्यांपूर्वी राहुरी शहरात गावठी कट्ट्यातून फायर झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी दोन गटांत झालेला वाद मंगळवारी पुन्हा उफाळून आला आणि राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांत तुंबळ हाणामारीची घटना घडली.

राहुरी शहरातील एकलव्य वसाहत येथे सुमारे सात महिन्यांपूर्वी दोन गटांत वाद निर्माण होऊन बोळीबार झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून दोन्ही गटांतील धुमश्चक्री चालूच आहे. तो वाद पुन्हा उफाळून आला. मंगळवारी दुपारी एकवाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात त्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले होते. सात महिन्यांपूर्वी राहुरी शहरातील एकलव्य वसाहत येथे माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर येथील तरुणाने गोळीबार करत हल्ला केला होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टसह प्राणघातक हल्ला करणे या कलमान्वये सोनाली बर्डे यांच्या फिर्यादीवरून नामदेव पवार, अमर पवार, अंकुश पवार यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या आरोपींची जामिनावर सुटका झाली.

Web Title: Two groups clashed on the premises of the police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here