Home महाराष्ट्र Maratha reservation: मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Maratha reservation: मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Maratha reservation canceled Supreme Court 

Maratha reservation: राज्यातील अतिशय महत्वाचा संवेदनशील मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी असल्याची भावना विनोद पाटील यानी व्यक्त केली.

या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडत असताना अनेक चुका झाल्या असे पाटील म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाणे आज निकाल दिला आहे. या निर्णयाकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. मराठा समाजाला शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत निर्णय झाला असून रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षेतेखाली ५ न्यायाधीशांच्या घटनापिठाने निकाल दिला. हा निकाल २६ मार्च रोजी न्यायालयाने राखून ठेवला होता.

Web Title: Maratha reservation canceled Supreme Court 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here