Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीचे लग्न रोखले

संगमनेर: अल्पवयीन मुलीचे लग्न रोखले

Breaking News | Sangamner: १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करणार नाही. 

Marriage of minor girl prevented

संगमनेर:  संगमनेर तालुक्यात डॉ. दीपेश पटे संचलित आपले मानवाधिकार फाउंडेशनने पदाधिकारी यशस्वीरित्या कार्य पार पडत आहेत. संगमनेर तालुक्यात एका गावात आज दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक  १९:३० वाजता एका मुलीचे लग्न होणार होते. याची माहिती एका  अज्ञात इसमाने आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या महा राज्य सचिव रेणुका दिघे यांना सांगितले.

त्यांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्याशी संपर्क साधून कार्यवाहीची मागणी केली, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी यशस्वी कार्यवाही बजावली. १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करणार नाही असे लिहून घेण्यात आले. या कामी पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे  यांनी विशेष सहकार्य केले.

Web Title: Marriage of minor girl prevented

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here