Home क्राईम प्रेयसीचा लग्नासाठी तगादा लावल्याने विवाहित प्रियकराने कायमचाच काटा काढला

प्रेयसीचा लग्नासाठी तगादा लावल्याने विवाहित प्रियकराने कायमचाच काटा काढला

married lover murder the thorn by begging for the sweetheart's 

कल्याण | kalyan Murder Crime: लग्न करण्यासाठी प्रेयसी वारंवार आपल्या विवाहित प्रियकरास त्रस्त करत असल्याने  रागाच्या भरात प्रियकराने टोकाचे पाउल उचलत प्रियसीचा काटा (Murder) काढल्याची घटना घडली आहे. आरोपी सागर हा कल्याण येथे राहत असून तो बेरोजगार आहे. तर मयत प्रेयसी प्रतिभा ही मुलुंड  येथील रहिवासी आहे. ती एक नर्स म्हणून काम करीत होती. या दोघांमध्ये पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते.

सागरचे अगोदरच लग्न झाले होते. त्याला दोन मुले होती.  प्रेयसी प्रतिभा लग्न करण्यासाठी वारंवार तगादा लावत होती.  रोजच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सागरने तिचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी बुधवारी रात्री तुर्भे येथील साई प्रणव लॉजवर आरोपी सागरने प्रेयसी प्रतिभाला बोलावले. दोघांनी संपूर्ण रात्र या लॉजवर घालवली. रात्र सरली मात्र, सकाळी दोघांमध्ये प्रचंड वादविवाद झाले.

यादरम्यानच सागरने प्रेयसी प्रतिभाचा गळा आवळून खून केला. लॉज मालक वरती रूममध्ये जाऊन पाहिले असता प्रतिभा बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यावेळी लॉज चालकाने प्रतिभाला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.  यावेळी पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सागरला पोलिसांनी अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता लग्नाचा तगादा लावत असल्याने आपणच प्रतिभाचा गळा आवळून खून केला असल्याची कबुली त्याने दिली.

Web Title: married lover murder the thorn by begging for the sweetheart’s 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here