Home अहमदनगर अहमदनगर: पोलीस वाहनाने महिलेला चिरडले, भीषण अपघात

अहमदनगर: पोलीस वाहनाने महिलेला चिरडले, भीषण अपघात

Woman crushed by police vehicle, horrific accident

Ahmednagar | Rahata | लोणी: राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील पिव्हीपी महाविद्यालय चौकात पोलीस फायर गाडी व दुचाकीच्या अपघातात (Accident) ३७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. कर्नाटक राज्यात जात असलेल्या पोलीस फायर गाडी जात असताना हा अपघात घडला.

गौरी योगेश देशपांडे वय ३७ रा. लोणी खुर्द ता. राहता असे मयत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास देशपांडे या त्यांची मुलगी तनयाला दुचाकीवरून पीव्हीपी महाविद्यालय येथील चौकातून दवाखान्यात घेऊन जात होत्या. यावेळी उमरगाव (गुजरात) कडून बंगळूर (कर्नाटक) येथे जात असलेल्या पोलीस फायरच्या वाहनाने देशपांडे यांना अक्षरशः फरफटत नेले. यामध्ये देशपांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी तनया ही गंभीर जखमी झाली आहे. यावेळी लोणी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघींना रुग्णालयात दाखल केले. मात्र देशपांडे यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पोलीस फायर वाहनाने सुमारे १०० फुट फरफटत नेले असल्याचे प्रत्यक्षदर्शिनीने सांगितले. याप्रकरणी चालक सोमनाथ रेकू चव्हाण व त्याचा साथीदार या दोघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.  

Web Title: Woman crushed by police vehicle, horrific accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here