Home Accident News संगमनेर: अॅपे रिक्षाच्या धडकेत एक जण ठार  

संगमनेर: अॅपे रिक्षाच्या धडकेत एक जण ठार  

Sangamner Accident One killed in Ape rickshaw crash

Sangamner Accident | संगमनेर: अॅपे रिक्षाने जोरदार धडक दिल्याने संगमनेर तालुक्यातील कौठ बुद्रुक येथील एक अपंग शेतमजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. घारगाव कोठे रस्त्यावर रासकाई मंदिर परिसरात शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

संतोष मुरलीधर दुधवडे वय ३२ असे मयत झालेल्या अपंग शेतमजुराचे नाव आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

दुधवडे हा शेतातील काम आटोपून रस्त्याच्या कडेने घरी पायी निघाले होते. घारगावकडून कोठ्याकडे जाणारी अॅपेरिक्षा क्रमांक एम.एच. १२ जीटी ६३०१ आली तेव्हा चालक आरोपी रामभाऊ किसन शिर्के रा. ता. शिरूर याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने संतोष दुधवडे याला धडक बसली. या अपघातात संतोष जागीच ठार झाले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर, पोलीस नाईक गणेश लोंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Sangamner Accident One killed in Ape rickshaw crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here