Home संगमनेर संगमनेर:  पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

संगमनेर:  पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Breaking News | Sangamner: ३९ वर्षीय विवाहितेने पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना.

married woman commits suicide due to her husband's troubles

संगमनेर: तालुक्यातील सुकेवाडी येथील ३९ वर्षीय विवाहितेने पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना २४ मार्च रोजी घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत शुक्रवार दि. २९ मार्च रोजी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

रिना राजेंद्र हाडवळे (वय ३९) या मयत महिलेचा विवाह राजेंद्र ज्ञानदेव हाडवळे (रा. कोल्हेवाडी रोड, काळेमळा, सुकेवाडी, मूळ रा. लिंगदेव, ता. अकोले) याच्याशी सन २००७ साली झाला होता. त्यानंतर दोन ते तीन वर्षांनी दारू पिवून लग्नात काही दिले नाही म्हणून वारंवार पैशांची मागणी करुन रिना हिचा शारीरिक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केले. अखेर या त्रासाला वैतागून विवाहितेने २४ मार्चला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील संपत तात्याबा काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी पती राजेंद्र हाडवळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.

Web Title: married woman commits suicide due to her husband’s troubles

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here