संगमनेर: तलाठ्याला मारहाण करून वाळूचे वाहन पळवून नेले
Breaking News | Sangamner: कामगार तलाठ्याला मारहाण करून त्यांच्या ताब्यातील वाळूने भरलेली पिकअप पळवून नेल्याची घटना.
संगमनेर: कामगार तलाठ्याला मारहाण करून त्यांच्या ताब्यातील वाळूने भरलेली पिकअप पळवून नेल्याची घटना संगमनेर खुर्द परिसरात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगार तलाठी संग्राम देशमुख हे त्यांच्या पथकासह संगमनेर खुर्द परिसरात गस्त घालत होते. त्यांनी संगमनेर खुर्द येथील तलाठी कार्यालयाकडून प्रवरा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळूने भरलेली एक पिकअप पकडली. यामुळे संतप्त झालेल्या वाळूतस्करांनी या तलाठ्यास दमदाटी करून मारहाण केली त्यांच्या ताब्यातील विनाक्रमांकाची पिकअप पळवून नेली. याबाबत कामगार तलाठी संग्राम देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पिकअप वाहन चालक, दुचाकीवरील चालक कैफ पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही व नफीस याचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Sangamner Crime Talathi was beaten and the sand vehicle was taken away
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study