Home अहमदनगर युवकांच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या- Suicide

युवकांच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या- Suicide

Shrirampur Suicide News:  दोन युवकांनी त्रास दिल्यामुळे कंटाळून तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.

married woman committed suicide by hanging herself at her residence

श्रीरामपूर: एका २० वर्षीय विवाहित तरुणीला तिच्याच भागात राहणाऱ्या दोन युवकांनी त्रास दिल्यामुळे कंटाळून तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील वार्ड नंबर ७ मधील सुभाष कॉलनीत घडली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेरणा नेटके ही २० वर्षीय विवाहित युवती नीट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी श्रीरामपुरात आपल्या माहेरी आली होती. सुभाष कॉलनी परिसरातील अनिल मेडिकल समोर तन्मय सोनकांबळे (रा. सरस्वती कॉलनी) तसेच साईसागर निमोणकर (रा. सुभाष कॉलनी) यांनी तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आदल्या दिवशीही या दोघांविरुध्द प्रेरणा हिने शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

मात्र 9 ऑगस्ट रोजी सुभाष कॉलनी परिसरातील अनिल मेडिकल समोर तन्मय सोनकांबळे (रा. सरस्वती कॉलनी) तसेच साईसागर निमोणकर (रा. सुभाष कॉलनी) यांनी तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खिलारी वस्ती या ठिकाणी राहणारे नातेवाईक साडू रावसाहेब चव्हाण हे नेटके यांच्याकडे आमचे दारात पडलेली लाकडे तोडण्यासाठी कुर्‍हाड आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी व नात प्रेरणा दोघेही घरीच होते.

कुर्‍हाड आणून पाणी पिण्यासाठी चव्हाण घरात गेले असता मधल्या खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा लोटून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता पंख्याशेजारी आडव्या लोखंडी पोलला साडी बांधून प्रेरणा हिने फाशी घेतल्याचे दिसले. तेव्हा चव्हाण यांनी आरडाओरडा करुन मदतीसाठी सागर रावसाहेब पवार, बबलू रावसाहेब पवार, संदीप भाऊसाहेब आडांगळे धावून आले. या सर्वांनी साडी कापून प्रेरणाला खाली घेतले व मोटारसायकल लावून प्रेरणाला साखर कामगार रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच ती मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिचे नातेवाईक पुंडलिक खरे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी तन्मय सोनकांबळे (रा. सरस्वती कॉलनी) तसेच साईसागर निमोणकर (रा. सुभाष कॉलनी) यांचेविरुध्द आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा देवरे करीत आहेत. पोलीस आरोपींचा घेत यातील एकास अटक करण्यात आली आहे. तर दुसर्‍या पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: married woman committed suicide by hanging herself at her residence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here