Home क्राईम मसाज सेंटरवर छापा, परदेशी महिलांना नोकरीवर ठेवून सुरु होता वेश्याव्यवसाय

मसाज सेंटरवर छापा, परदेशी महिलांना नोकरीवर ठेवून सुरु होता वेश्याव्यवसाय

Pune Crime: परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी मसाज सेंटरवर छापा, महिलांकडून वेश्याव्यवसाय (prostitution) करुन घेतला जात असल्याचं सांगितलं जात.

Massage center was raided, prostitution was started by hiring foreign women

पुण्यातील  परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. कोंढवा परिसरातील या खासगी स्पामध्ये परदेशी महिला वैध व्हिसाशिवाय काम करताना आढळून आल्या आहेत.  या महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे. तत्पूर्वी व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऑफिसच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी 24 मार्च रोजी शहरातील कोंढवा भागातील एका खाजगी स्पावर छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान अवैधरित्या परदेशी महिलांना नोकरीवर ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या नियमावलीनुसार परदेशी व्यक्तीने नोकरी करण्यासाठी व्हिसा संदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचं आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या महिलांकडे रोजगार व्हिसा नसतानाही त्यांना कामावर ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

या महिला बिझनेस व्हिसावर भारतात आल्या होत्या. पण त्या योग्य रोजगार व्हिसाशिवाय स्पामध्ये काम करत होत्या. या महिला थायलंड देशातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सध्या मुंढवा इथल्या शासकीय महिला सुधारगृह इथे ठेवण्यात आलं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चार महिलांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितलं.

Web Title: Massage center was raided, prostitution was started by hiring foreign women

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here