Home क्राईम महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं

महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं

Pune Crime: खाणीमध्ये उडी मारत स्वतःला संपवल्याची (Suicide) धक्कादायक घटना, आत्महत्या केलेली व्यक्ती रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी शेजारच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.

Rickshaw puller committed suicide because of the humiliation of being beaten by women

पुणे : पुण्याच्या धानोरी परिसरात दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने खाणीमध्ये उडी मारत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. तपासानंतर आत्महत्या केलेली व्यक्ती रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी शेजारच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस  अधिक तपास करत आहेत.

अजय शिवाजी टिंगरे (42) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. अजय टिंगरे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. अजय टिंगरे यांनी दारू पिऊन घरी आल्यानंतर दारात उभे राहून शिवीगाळ केली होती. त्यानंतर शेजारच्यांनी घरात घुसून अजय टिंगरे यांना मारहाण केली होती. यामध्ये काही महिलांनी देखील अजय टिंगरे यांना घराबाहेर काढत मारहाण केली होती. संपूर्ण गावासमोर महिलांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा अपमान सहन न झाल्याने अजय टिंगरे यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि खाणीत उडी मारली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  अजय टिंगरे 23 मार्च रोजी रात्री दारु पिऊन घरी आले होते. त्यानंतर त्यांनी दारात उभे राहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेजारच्यांनी अजय टिंगरे यांच्या पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या पतीला समजावून सांगण्यास सांगितले. मात्र तरीही अजय टिंगरे ऐकत नव्हता. शेवटी पोलिसांनी याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी समज दिल्यानंतर अजय टिंगरे घरात जाऊन झोपला.

मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी अजय टिंगरे यांच्या शेजारचे जबरदस्तीने त्याच्या घरात शिरले आणि झोपेत असतानाच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घराबाहेर आणले. अजय टिंगरे यांच्या पत्नीने त्यांना मारू नका अशी विनवणी केली. मात्र तो मार खाण्याच्या लायकीचाच आहे. त्याला मारा, असे शेजारच्यांनी सांगितले आणि मारहाण सुरुच ठेवली. आरडाओरडा पाहून शेजारचे जमा होऊ लागले. त्यानंतर शेजारच्यांनी तिथून काढता पाय घेतला.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह 4 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

Web Title: Rickshaw puller committed suicide because of the humiliation of being beaten by women

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here