Home क्राईम भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

Sangli Crime: खंडोबाचीवाडीमध्ये भरधाव वेगाने जाणारी कार थेट रसवंतीगृहाच्या शेडमध्ये घुसल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना.

schoolboy death on the spot when a speeding car rammed directly into Raswantigriha

सांगली: जिल्ह्यात पलूस  तालुक्यातील खंडोबाचीवाडीमध्ये भरधाव वेगाने जाणारी कार थेट रसवंतीगृहाच्या शेडमध्ये घुसल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  समर्थ संतोष शिंदे (वय 11) असे मयत  मुलाचे नाव आहे. हा अपघात रविवारी घडला. भिलवडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून या घटनेनंतर चालक फरार झाला आहे. समर्थचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबातील लोकांनी व आई वडील यांनी मोठा हंबरडा फोडला.  

याबाबत अधिक माहिती अशी की, तासगांव भिलवडी रोडवर खंडोबाचीवाडीत नायरा पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या शेताकडेला संतोष गोपाळ शिंदे  यांचे रसवंतीगृह आहे. या रसवंतीगृहात चालक शिंदे यांचा मुलगा समर्थ बसला होता. भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी सियाज कार (एमएच-10-सीएक्स-4081) रसवंती गृहाच्या शेडमध्ये घुसली. अपघात इतका भयंकर होता की रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललेली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या रसवंतीगृहात भरधाव वेगाने घुसली. रसवंती गृहाचे पत्र्याचे शेड उचकटून ते शेतात कोसळले.

रसवंतीगृहाजवळ बसलेल्या समर्थलाही गाडीने फरफटत नेले. गाडीच्या पुढील चाकाखाली आल्याने समर्थचा जागीच मृत्यू झाला. समर्थ खंडोबाचीवाडी विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता.अपघातानंतर ग्रामस्थ जमा होत असल्याचे पाहून  चालक वाहन सोडून पसार झाला. सदर घटना नायरा पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत भिलवडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Web Title: schoolboy death on the spot when a speeding car rammed directly into Raswantigriha

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here