Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात गोवरने चिंता वाढवली तर कोरोनाचे सहा अॅक्टिव्ह रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात गोवरने चिंता वाढवली तर कोरोनाचे सहा अॅक्टिव्ह रुग्ण

Ahmednagar News | Corona:  जिल्ह्यात महिन्याभरात गोवरचे सहा रुग्ण आढळून आले आहे. एकही रुग्ण दगावल्याची नोंद नाही. कोरोना नंतर गोवरने डोके वर काढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Measles raises concern in Ahmednagar six active patients of Corona

अहमदनगर:राज्यात कोरोनानंतर गोवर या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागत सतर्क झाला आहे. जिल्हा भरात गोवर प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. गोवर लक्षणे असलेल्या १७२ नमुण्यांपैकी ६ रूग्ण महिनाभरात बाधीत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या बाधीत रूग्णांची प्रकृती स्थिर असून, आतापर्यंत जिल्ह्यात एकही रूग्ण दगावल्याची नोंद नाही.

गोवर आजाराच्या रूग्णांची अचानक वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १८ नोव्हेंबरला बाल विकास विभागासह इतर यंत्रणांना निर्देश दिले. गोवर विषाणू खोकल्यातून हवेमार्फत पसरतो व श्वसनाद्वारे शरिरात प्रवेश करतो. ताप येणे, लाल पुरळ, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

विषाणुंचा शरिरात प्रवेश झाल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षण दिसून येऊ शकतात. दोन ते चार दिवसानंतर अंगावर पुरळ येणे, कानाच्या मागे, चेहरा छाती, पोटावर हे पुरळ पसरू शकतात. या रोगाची लक्षणे आढळल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्वाधिक ७४ केस मुंबई, मालेगाव ४५, नाशिक १६ तसेच इतर भागात रूग्ण आढळून आले होते. अहमदनगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात प्रथमच ६ गोवरचे रूग्ण आढळून आले. याप्रकरणी बाधित गावांतील संशयीत रूग्णांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत लसीकरण मोहिम राबवून एकही रूग्ण वंचित राहणार नाही, याची खबरदारी आरोग्य विभाग घेत आहे.

रूग्ण आढळलेले ठिकाणे

जिल्ह्यात खडकवाडी १ (पारनेर), जेऊन १ (नगर), लोणी व्यंकनाथ २ (या ठिकाणी मुलगी व आई) (श्रीगोंदे), नगर शहर मनपा कार्यक्षेत्रात १, तळेगाव दिघे १ (संगमनेर) असे रूग्ण आढळून आले. आतापर्यंत १७२ संशयीतांचे नमुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाने माहिती दिली.

दहा दिवसांत लसीकरण

गोवर रूबेला लसीकरणासाठी जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत ३ हजार ५१२ बालकांना लस देण्यात आली. ही मोहिम १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत राबवली. दरम्यान, गोवरची लक्षणे बालकांमध्ये नव्हे, तर प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येत असल्याने त्यांचेही नमुने घेतले जात आहेत.

कोरोना: चीनमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने ऑक्सिजन बेड, ऑक्सीजन व औषध साठा याचा आढावा घेतला. नगरमध्ये बुधवारी कोरोनाचे सहा अॅक्टिव्ह रुग्ण नोंदवण्यात आले.

उत्तर महाराष्ट्र नगर मध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगर जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेने उपाययोजनांचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनाचे सहा ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पाच ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर जळगाव, नंदुरबार, धुळे येथे एकाही ऍक्टिव्ह रुग्णाची नोंद नाही.

Web Title: Measles raises concern in Ahmednagar six active patients of Corona

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here