Home क्राईम प्रियकराने विवाहास नकार दिल्याने गर्भवती असलेल्या २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

प्रियकराने विवाहास नकार दिल्याने गर्भवती असलेल्या २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Suicide News:  प्रियकराने विवाहास नकार दिल्यानंतर गर्भवती असलेल्या तरूणीने गळफास घेऊन केल्याची खळबळजनक घटना.

24-year-old pregnant woman commits suicide after boyfriend refuses marriage

पुणे | Pune : प्रियकराने विवाहास नकार दिल्यानंतर गर्भवती असलेल्या तरूणीने गळफास घेऊन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या नातेवाईकांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्या केलेली तरूणी पर्वती पायथा येथील जनता वसाहतीमध्ये रहावयास होती. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकर संग्राम उर्फ पिटया विलास पानसरे, त्याची आई, मावशी आणि एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात 24 वर्षीय तरूणीच्या आईने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरूणीचे संग्रामसोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबियांना त्यांच्यामधील प्रेमसंबंधाबाबत कल्पना होती. दोघे विवाह करणार होते. दरम्यान, तरूणी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपी प्रियकर संग्रामने तिच्यावर संशय घेतला आणि तिचा छळ सुरू केला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

 संग्रामने तरूणीशी विवाहास नकार दिला. पाच दिवसांपुर्वी तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तरूणीच्या आईने दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दिली.त्यानंतर पोलिसांनी तरूणीचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संग्राम आणित्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 24-year-old pregnant woman commits suicide after boyfriend refuses marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here