Home अहमदनगर Ahmednagar News: अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई अन्यायकारक: रोहित पवार

Ahmednagar News: अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई अन्यायकारक: रोहित पवार

Ahmednagar News: रोहित पवार (karjat): अधिकाऱ्यांचे काम उल्लेखनीय असतानाही निलंबनाची कारवाई अन्यायकारक

Suspension of officers unfair Rohit Pawar

जवळा: काही दिवसांपासून उल्लेखनीय कामगिरी करत कर्जत- जामखेडचे नाव राज्यपातळीवर उंचावण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या कार्यतत्पर अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई ही अन्यायकारक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खचण्याची आणि त्याचा लोकांना सेवा देण्याच्या कामांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. पवार यांनी पत्रकान्वये कारवाईचा निषेध केला आहे.

कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व आहे. कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे निलंबन करण्यात आले. जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते आणि कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची बदली करण्यात आली.

 या अधिकाऱ्यांबाबत पवार यांनी पत्रकात -म्हटले आहे की, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यामुळेच कर्जत-जामखेड हे तालुके अव्वल ठरले. या कामांची यादीही पवार यांनी पत्रकात नमूद केली

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

डॉ. अजित थोरबोले यांनी कर्जत उपविभागाला पुढे नेण्यासाठी आणि अग्रेसर ठेवण्यासाठी कायमच प्रयत्न केले. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनीदेखील कर्जत तालुक्यात विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. कर्जत येथील मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी नगर पंचायतचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. जामखेड येथील बदली करण्यात आलेले मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी नुकताच घरकुल योजनेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. राजकीय आकसापोटी कारवाई करून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अन्याय केला जाणार असेल तर कर्जत- जामखेडला कोणी अधिकारी येण्यास देखील तयार होणार नाही व परिणामी पुन्हा पूर्वीचे दिवस परत येतील, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.

विधान परिषदेमध्ये मतदारसंघातील नागरिकांच्या हिताचा एकही प्रश्न राम शिंदे यांनी मांडला नाही. त्यांनी फक्त राजकीय द्वेषातून अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि कामे थांबवा याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. अन्यायकारक कारवाई केलेल्या अशा चांगल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर कर्जत जामखेडमधील जनता, पदाधिकारी आम्ही सर्वजण उभे आहोत. झालेल्या कारवाईचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो.

-रोहित पवार, आमदार

Web Title: Suspension of officers unfair Rohit Pawar

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here