तुटलेल्या विजेच्या तारेने घेतला मायलेकाचा बळी
शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श (electric shock) झाल्याने मायलेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. नंदा गुंगा मगदूम (४९) अजय गंगा मगदूम (३०, दोघेही रा. पन्हाळा) अशी मृतांची नावे आहेत.
शेतात भात लागणीसाठी टाकण्यासाठी अजय गेले होते. खत टाकलेल्या रोपाला खत टाकत असताना शेतात तुटून पडलेली विजेची तार नजरेत न आल्याने त्यांच्या पायाला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू
शेताकडे गेलेल्या मुलाचा फोन बंद आहे म्हणून आई नंदा शेताकडे गेल्या. मृत्युमुखी पडलेल्या मुलाची अवस्था पाहवली नाही म्हणून आईने मुलाच्या अंगावरील विजेची तार बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
Web Title: Mileka was killed by a broken power line electric shock
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App