Home अकोले कळस येथील घराला आग लागून, लाखोंचे नुकसान 

कळस येथील घराला आग लागून, लाखोंचे नुकसान 

Millions lost due to fire at Kalas

प्रतिनिधी गणेश रेवगडे | कळस : कळस बु येथील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाकचौरे व पांडुरंग वाकचौरे व प्रविण वाकचौरे यांच्या घराला सकाळी ९ वा च्या दरम्यान लाईटच्या शॉर्टसर्किट मुळे भीषण आग लागली.

 या आगीचा प्रचंड वेग असल्याने काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व उपयोगी वस्तु जळुन खाक झाल्या आहे.तातडीने अगस्ती कारखान्याचा अग्निशमन दल पाचारण करण्यात आले व ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीला विझविण्यात यश मिळाले. सदर घर जुन्या सागवानाचे असल्यामुळे सागवानाने पेट घेऊन लाखोंचे नुसकान झाले आहे.सदर ठिकाणी कळस गावचे पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याचे आदेश दिले.

महावितरण चे इंजी श्रीराम साहेब तसेच तलाठी प्रमोद शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे केले.यावेळी कळस सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे,सरपंच राजेंद्र गवांदे,उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे,अरूण वाकचौरे,जालींदर वाकचौरे,सागर वाकचौरे,गोरख वाकचौरे,सोमनाथ कवडे,राहुल वाकचौरे,नामदेव निसाळ,प्रकाश बिबवे,संजय नवले,प्रविण वाकचौरे सर,आभाळे,नितीन वाकचौरे,सुदाम वाकचौरे,पुरूषोत्तम सरमाडे,कृनाल वाकचौरे,बाबाजी भुसारी,अर्जुन भुसारी,शरद दातखिळे व सर्व ग्रामस्थ तरूण युवावर्ग मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी मदतकार्यास उपस्थित होते. पंचनामे करून तातडीने प्रशासनाने योग्य ती मदत सदर कुटुंबास करावी अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Millions lost due to fire at Kalas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here