संगमनेर: मृत मुलांच्या कुटुंबियाची मंत्री विखे पाटलांनी भेट घेऊन केली ही घोषणा
Sangamner news: पोहायला गेलेल्या चार मुलांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू (Death) झाल्याची घटना.
संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावा अंतर्गत असणाऱ्या येठेवाडी परिसरातील वांदरकडा येथे तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत अनिकेत अरूण बर्डे(वय ८ वर्ष), ओंकार अरुण बर्डे(वय ७ वर्ष), दर्शन अजित बर्डे(वय ६ वर्ष), विराज अजित बर्डे( वय ५ वर्षे) या चार चिमुकल्यांना जीव गमावावा लागला आहे. दरम्यान आज सकाळी मृत मुलांच्या कुटुंबियांची राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेत बर्डे कुटूंबियांना धीर दिला.
विद्युत वाहिनीची तार तुटून वीज प्रवाह सुरू राहिल्याने तलावात अंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना शॉक लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी घडली. त्यानंतर वीजवितरण कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप करत पालकांसह नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेनंतर वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे चौघांचा मृत्यू झाला असून घारगाव विभागाचे सहाय्यक अभियंता आणि वायरमन यांच्या निलंबनाचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी, वीज वितरण सानुग्रह अनुदान आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सहाय्यता योजनेतून मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ११ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा विखे पाटील यांनी केली आहे.
Web Title: Minister Vikhe Patal after meeting the families of the Death children