Home अकोले अकोले तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या- Suicide

अकोले तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या- Suicide

Akole Suicide News:  कर्जाला कंटाळून तसेच चाळीत साठवलेला कांदा सडल्याने चाळीतील पाईपला गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना.

Suicide of a farmer in Akole taluka

अकोले: अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून तसेच चाळीत साठवलेला कांदा सडल्याने चाळीतील पाईपला गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

परशुराम पोपट पापळ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अकोले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविचेदानासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेने तालुक्यात व धामणगाव आवारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. परशुराम पोपट पापळ यांनी अतिशय कष्टाने पिकविलेला कांदा चाळीत ठेवला होता मात्र तो पूर्ण सडून गेला. घरची हलाखीची परिस्थिती असताना वाट्याने जमीन करून अतिशय चांगला कांदा पिकविला होता. कांदा पिकून दोन पैसे मिळतील या आशेने तो कष्ट करीत होता. कांदा विकायचा निर्णय त्याने घेतला होता. मात्र सडलेला कांदा पाहून त्या रागाच्या भरात त्याने आपली जीवनयात्रा संपविली. या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही ठोस पावले उचलले पाहिजे अशी ग्रामस्थांनी विनंती केली आहे.  

Web Title: Suicide of a farmer in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here