Home अकोले अकोले: पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

अकोले: पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

Akole News:  गावानजीक असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय मुलाचा  बुडून (drowned)दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

minor drowned in a well while going for a swim

अकोले: लिंगदेव येथील गावानजीक असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. देविदास महादु कातोरे असे या मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी की, महावीर जयंतीच्या सुट्टी निमित्ताने  पोहण्यासाठी लिंगदेव गावानजिक असलेल्या खोलवर विहिरीत देविदास महादु कातोरे या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या अंदाजे ९ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यु झाला आहे .

या घटनेची चाहुल लागताच लिंगदेव गावचे पोलिस पाटील मंगल गणेश पवार, व त्यांचे पती गणेश पवार यांच्यासह राधु फापाळे,संकेत फापाळे, ऋषीकेश कानवडे ,बाळासाहेब होलगीर ,विजय उघडे, तसेच माजी सरपंच गोविंद कातोरे आदिंनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली अन अकोले पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Web Title: minor drowned in a well while going for a swim

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here